‘म्हाडा’च्या कोकण आणि मुंबई मंडळातील घरांसाठी डिसेंबर २०१३ मध्ये सोडत काढण्याची सूचना पुढे आली आहे. त्यामुळे कोकण मंडळातील घरांसाठी दिवाळीत काढण्यात येणारी सोडत वर्षांअखेरीस होण्याची शक्यता आहे. तर पुढच्या वर्षीच्या मे महिन्यातील सोडतीमधील काही घरांचा डिसेंबरच्या सोडतीत समावेश करण्याबाबत विचार सुरू झाला आहे. याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत होणार आह़े
‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे दिवाळीच्या वेळी सुमारे २५०० घरांची सोडत काढण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील मे महिन्यात मुंबई मंडळ आणि कोकण मंडळाची मिळून आणखी सुमारे तीन हजार घरांची सोडत काढण्यात येईल. अशा रितीने येत्या वर्षभरात ‘म्हाडा’तर्फे एकूण ५५०० घरांची सोडत निघण्याची शक्यता प्राधिकरणाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी घरांच्या सोडतीच्यावेळी वर्तवली होती. त्यामुळे कोकण मंडळाची सोडत दिवाळीवेळी निघणार असे जवळपास निश्चित मानले जात होते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2013 रोजी प्रकाशित
म्हाडाची सोडत डिसेंबरमध्ये ?
‘म्हाडा’च्या कोकण आणि मुंबई मंडळातील घरांसाठी डिसेंबर २०१३ मध्ये सोडत काढण्याची सूचना पुढे आली आहे. त्यामुळे कोकण मंडळातील घरांसाठी दिवाळीत काढण्यात येणारी सोडत वर्षांअखेरीस होण्याची शक्यता आहे.
First published on: 12-07-2013 at 02:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhadas lottery in december