मुंबई : एमएचटी सीईटीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी सायंकाळपासून सुरूवात झाली. १७ हजार ९२६ जागांसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी २७ जुलैला जाहीर होणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) देण्यात आली.

हेही वाचा : मुंबई: क्षय रुग्णसेवेत पालिकेचाच खोडा, २४ सक्षम क्षयरोग साथींना काम सोडण्याचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषी शिक्षणामध्ये बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान आदी. अशा नऊ अभ्यासक्रमांना एमएचटी सीईटीच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषीच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यामध्ये २०३ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ९२६ जागा आहेत.