मनसेने मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला असताना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबईत पोलिसांनी मनसे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त केले आहेत. तसंच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचं साहित्यदेखील जप्त करण्यात आलं आहे.

मोठी बातमी! इतर राज्यातील लोक येऊन महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात; गुप्तचर विभागाचा अलर्ट

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

महेश भानुशाली घाटकोपरमधील चांदिवली मतदारसंघात मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या कार्यालयातील भोंगे ताब्यात घेतले आहेत. तसंच उद्याच्या आंदोलनासाठी जमा केलेलं साहित्यही जप्त केलं आहे.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

दरम्यान राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सभेतील भाषणानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राज ठाकरेंसोबत सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या सभेचे व्हिडीओ पाहिल्यानतंर ही कारवाई करण्यात आली आहे.

“राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार”; पोलीस महासंचालकांची महत्वाची माहिती

पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात

“कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा कट

इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचं गृह विभागाने सांगितलं आहे.