राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना राज ठाकरेंनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसंच स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिली आहे. दरम्यान बाळा नांदगावकर यांनी मात्र अद्याप यावर चर्चा सुरु असल्याचं सांगितलं आहे.

संदीप देशपांडे यांनी सांगितलं की “राज ठाकरेंनी बैठकीत महानगरपालिका निवडणुकांना कसं सामोरे जायचं यासंदर्भातील मार्गदर्शन केलं. सर्व महापालिकांच्या सर्व जागा लढवण्याचे निर्देश राज ठाकरेंनी दिले आहेत. त्या कशा लढवायच्या यासंदर्भातील मार्गर्शन राज ठाकरेंनी केलं”. राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला का? असं विचारण्यात आलं असता सगळ्या महापालिकांमधील सगळ्या जागा म्हणजे अर्थ तोच झाला असं सांगत त्यांनी दुजोरा दिला.

राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट वाद सुरु असताना राज ठाकरेंचा मोठा निर्णय, पदाधिकाऱ्यांना म्हणाले “मी तुम्हाला…”

तुमची विचारसरणी सकारात्मक असणं गरजेचं आहे असंही राज यांनी तेच सांगितलं. “आम्हाला सहानुभूती मिळत असल्याचा, आम्ही रडलो तर लोकांच्या डोळ्यात पाणी येईल असा खोटा प्रचार सुरु आहे. त्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. अशी कोणतीही सहानुभूतीची लाट नाही,” असं राज ठाकरेंनी सांगितलं असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

“विचार सकारात्मक ठेवा, तुम्हाला सत्तेत नेण्याचं काम मी करेन. सत्तेत नेण्याचं काम म्हणजे तुम्हालाच सत्तेत बसवेन. तुम्हाला सांगून मी खुर्चीत बसणार नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं,” अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

Maharashtra News Live : शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार? राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र, राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

“मनसेबद्दल लोक सकारात्मक असून, तुम्हीदेखील सकारात्मक राहा. आपण सत्तेत येऊ आणि तुम्हालाच त्या खुर्चीवर बसायचं आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. बाळासाहेबांनी कधीच आपल्याकडे कोणतं पद घेतलं नव्हतं आणि तीच शिकवण राज ठाकरेंकडे आहे. सत्तेचा रिमोट कंट्रोल ज्याप्रकारे बाळासाहेबांकडे होता, त्याप्रकारे आम्ही सत्तेत आल्यानंतर तो राज ठाकरेंकडे असेल असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर त्यांना फक्त यशच मिळालं नाही. त्यांना पराभवही पाहावा लागला. पण पराभवामुळे ते कधी रडले नव्हते. आम्हीदेखील विजय, पराभव पाहिला. पण आम्ही रडलो नाही, तर लढलो. येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला सर्वात मोठं यश मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे,” अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.