scorecardresearch

राज ठाकरेंच्या नातवाचा पहिला फोटो समोर, कॅप्शन देताना अमित ठाकरे म्हणाले…

त्यांनी शेअर केलेला हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे काही दिवसांपूर्वीच आई बाबा झाले आहे. राज ठाकरेंच्या सूनबाई मिताली ठाकरे यांना काही दिवसांपूर्वीच पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. त्यामुळे सध्या ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकतंच अमित ठाकरे यांनी बाळासोबतचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांनी ५ एप्रिल २०२२ रोजी बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी सचिन मोरे यांनी फेसबुकवर “आमचे साहेब आजोबा झाले,” अशी पोस्ट शेअर केली होती. त्यासोबतच त्यांनी “युवराजांचं आगमन” अशीही पोस्ट शेअर करत राज ठाकरेंना नातू झाल्याचंही म्हटलं होतं. त्यासोबत त्यांनी अमित ठाकरेंचंही अभिनंदन केलं होतं.

Good News… राज ठाकरे झाले आजोबा! अमित आणि मिताली यांना पुत्ररत्न प्राप्ती

दरम्यान बाळाच्या जन्मानंतर अमित ठाकरे यांनी नुकतंच फेसबुकवर त्याच्यासोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील आहे. यात बाळाने अमित ठाकरेंची करंगळी हातात घट्ट पकडल्याचे दिसत आहे. या फोटोत बाळाचा चेहरा स्पष्ट पाहायला मिळत नाही. मात्र हा फोटो बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयातच काढल्याचे आजूबाजूच्या परिसरावरुन दिसत आहे. अमित ठाकरेंनी शेअर केलेल्या या पोस्टला कॅप्शन देताना त्यांनी फक्त ‘हार्ट’ इमोजी शेअर केला आहे.

त्यांच्या या फोटोवर अनेक लाइक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. यावर मनसेचे अनेक पदाधिकारी, कुटुंबीय आणि तसेच काही जवळच्या मित्र मैत्रिणींनीही कमेंट केली आहे. यात त्यांनी अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.

२०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात अमित आणि मिताली यांचा साखरपुडा पार पडला होता. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. मिताली यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन आहेत. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर दोघंही विवाहबंधनात अडकले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns raj thackeray son amit thackeray share newborn baby photos on facebook post nrp