करोना निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने ३० ऑगस्ट २०२१ रोजी राज्यभरातील मंदिरांपुढे शंखनाद आंदोलन केले. करोनामुळे सध्या राज्यातील मंदिरांना टाळ लागलंय. राज्यातील मंदिरं उघडण्यावरून घमासान सुरु आहे. विरोधी पक्षाकडून हा मुद्दा वारंवार उचलूनही धरला गेला आहे. राज्य हळूहळू अनलॉक करत असताना देखील मंदिरांना लागलेली कुलुपं मात्र उघडली गेली नाहीत. सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरं बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचं दर्शन दिलं जातेय. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर आता मनसेने यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. लोकसत्ताचा व्हिडीओ शेअर करत मनसेने, “कुणी कुणाचा नाद करायचा, हे ठरवणं सोपं जाईल,” असं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर हे कोणाच्या आदेशाने करतात याची चौकशी करण्याची मागणीही केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी मुंबई पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करोना निर्बंधांच्या आड सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध जपणारी आणि सर्वसामान्यांच्या त्रासात विनाकारण भर घालणारी दुटप्पी धोरणं सरकार आखत असल्याची टीका केली होती. तसेच “सर्व मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. अन्यथा, मंदिरांबाहेर आम्ही घंटानाद करू,” असं म्हटलं होतं. याचाच संदर्भ लोकसत्ता डॉट कॉमच्या व्हिडीओशी जोडून मनसेने व्हिआयपींना परवानगी दिली जाते याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. कुणी कुणाचा नाद करायचा, हे ठरवणं सोपं जाईल, असं मनसेनं म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns slams cm uddhav thackeray and adesh bandekar for allowing vip in siddhivinayak temple during corona time scsg
First published on: 01-09-2021 at 14:42 IST