मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी संस्थगित झाले. हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. विधानसभेतील बैठकांची संख्या १५, प्रत्यक्ष झालेले कामकाज १३३ तास ४ मिनीटे, रोजचे सरासरी कामकाज ८ तास ५५ मिनीटे, स्वीकृत झालेले तारांकित प्रश्न ५७९, उत्तरित तारांकित प्रश्न ९२, मंजुर विधेयके १५, एक विधेयक मागे घेण्यात आले. ७ अर्धा तास चर्चा झाल्या. अन्य कारणांमुळे ४५ मिनीटे सभागृहाचा वेळ वाया गेला. ५११ लक्षवेधी स्वीकृत झाल्या, पैकी १५२ लक्षवेधींवर चर्चा झाली. सदस्यांची सरासरी उपस्थिती ८२.२३ टक्के होती.
विधानपरिषदेच्या एकुण बैठकांची संख्या १५, प्रत्यक्ष कामकाज १०५ तास, सरासरी दैनंदिन कामकाज ७ तास झाले. मंत्री उपस्थित नसल्याने सभागृहाचा १ तास २ मिनीटे वेळ वाया गेला. स्वीकृत तारांकीत प्रश्नांची संख्या ४९३ पैकी ८१ तारांकित प्रश्नावर चर्चा झाली. २०२ लक्षवेधी स्वीकृत झाल्या, त्यापैकी ७९ लक्षवेधीवर चर्चा झाली. विधानसभेने मंजूर केलेली १२ विधेयके संमत करण्यात आली. सदस्यांची सरासरी उपस्थिती ८४.५३ टक्के होती.