लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ऑगस्टमध्ये मुंबईतील १० हजार ४४३ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून मुद्रांक शुल्काच्या रूपात ७७३ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
CIDCO announced rates of 26 thousand houses in Navi Mumbai
परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक्
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
residential housing market Mumbai , Knight Frank India,
मुंबई देशातील सर्वात मोठी निवासी घरांची बाजारपेठ! ‘नाइट फ्रँक इंडिया’चा अहवाल जाहीर
bmc collected 68 percent property tax in nine months
६८ टक्के मालमत्ता कर वसूल; नऊ महिन्यांत ५ हजार ८४७ कोटी मालमत्ता कर संकलन
housing business Rising prices the election
वाढत्या किमती अन् निवडणुकांमुळे घरांच्या बाजारपेठेला घरघर
In December Mumbai sold over 12 000 houses generating Rs 1116 crore in stamp duty
वर्षभरात मुंबईतील सव्वा लाखांहून अधिक घरांची विक्री, राज्य सरकारच्या तिजोरीत १२ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा

मागील काही महिन्यांपासून मुंबईतील घर विक्री स्थिर आहे. साधारण ९ हजार ते १३ हजार या दरम्यान घरांची विक्री होत असून आता सणासुदीच्या काळात दसरा, दिवाळीत घरांच्या विक्रीत वाढ होईल, अशी आशा बांधकाम उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जून आणि जुलै या महिन्यांत ९ ते ११ हजारादरम्यान घरांची विक्री झाली असून केवळ मार्चमध्ये १३ हजार घरांच्या विक्रीचा टप्पा पार केला होता.

आणखी वाचा-औषधांसाठी क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना साकडे

मार्चमध्ये १३ हजार १५१ घरांची विक्री झाली होती आणि यातून १२२५ कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. एकूणच या वर्षातील आठ महिन्यांच्या कालावधीत घरविक्री १४ हजारांचाही टप्पा पार करू शकलेली नाही. मार्च २०२१ मध्ये १७ हजार ७२८ घरांची विक्री झाली होती. तर मार्च २०२२ मध्ये १६ हजार ७२६ घरांची विक्री झाली होती. यातून सरकारला ११६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. पण आता मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात घरांच्या विक्रीत वाढ होईल, अशी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांना अपेक्षा आहे.

Story img Loader