गोवरबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. महिनाभरामध्ये मुंबईतील गोवरचे ५०० हून अधिक रुग्ण बरे झाले असून प्रकृतीत सधारणा झाल्यामुळे या रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये २०० रुग्णांना रुग्णालयांतून घरी पाठविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Shraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

मुंबईच्या १६ प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवरला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून सर्वतोपरीने उपाययोजना करण्यात येत आहेत. लसीकरणावर भर देण्याबरोबरच गोवरबाधित आणि संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गोवरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कस्तुरबा रुग्णालयासह शहरातील अन्य सात रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण ३३० खाटा उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत गोवरचे ४४० रुग्ण, तर चार हजार ७९३ संशयित रुग्ण आढळलेले आहेत. तसेच १४ बालकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे दिवसेंदिवस गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच वेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. गोवरचे रुग्ण तसेच उपचाराची आवश्यकता असलेल्या संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या रुग्णांपैकी महिनाभरामध्ये ५२५ जण पूर्णतः बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तसेच आठवडाभरात प्रकृतीत सुधारणा झालेल्या २०२ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून दररोज सरासरी ३० रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात येत आहे.

हेही वाचा- विश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का? मुंबईची हवा इतकी का खालवली?

गेल्या ११ दिवसांत बरे रूग्ण झालेले रुग्ण

२८ नोव्हेंबर : ४९
२९ नोव्हेंबर : २९
३० नोव्हेंबर : ३०
१ डिसेंबर : ३०
२ डिसेंबर : ३३
३ डिसेंबर : ३०
४ डिसेंबर : –
५ डिसेंबर : ४०
६ डिसेंबर : २८
७ डिसेंबर : १८
८ डिसेंबर : २३

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 500 patients freed from measles within a month in mumbai print news dpj
First published on: 09-12-2022 at 13:01 IST