१०१५ पैकी ३४० गाडय़ांचे आरक्षण पूर्ण

मुंबई : कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या गणपती विशेष गाडय़ांच्या आरक्षणाला प्रतिसाद वाढू लागला आहे. मुंबई परिसरातून जाणाऱ्या एक हजार १५ जादा गाडय़ांपैकी ३४० बस आरक्षित झाल्या आहेत. यात गट आरक्षणाच्या गाडय़ाही आहेत. गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या जादा गाडय़ांबरोबरच मध्य रेल्वेकडूनही ४० किं वा त्यापेक्षा जादा गाडय़ा सोडण्याची तयारी के ली आहे.

गणेशोत्सवाला १० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघरमधून जाण्यासाठी व कोकणातून येण्यासाठी २,२०० जादा बसगाडय़ांची घोषणा के ली. या बस ४ सप्टेंबरपासून सुटतील. १६ जुलैपासून जाण्याचे व परतीचेही आरक्षण सुरू झाले आहे. मुंबई, ठाणे व पालघरअंतर्गत  विविध आगारांतून सुटणाऱ्या प्रथम एक हजार १५ जादा गाडय़ा आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील गट आरक्षणाच्या १०० बस आणि स्वतंत्र आरक्षणाच्या २४० गाडय़ा आरक्षित झाल्या आहेत.

खासगी बस भाडेवाढ

यंदा झालेली इंधनदरवाढ यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात खासगी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सने जाणाऱ्यांच्या खिशाला काहीशी कात्रीही लागू शकते. मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी गेल्या वर्षी याच काळात डिझेलचा दर प्रति लिटर ७० रुपये होता. तोच आता १०० रुपयांपर्यंत गेला. इंधन दरवाढ ही परवडणारी नाही. तसेच गेल्या वर्षीही गणेशोत्सवात उत्पन्न नव्हते. त्यामुळे यंदा गणेशोत्सवकाळात खासगी बसचे भाडे २० टक्क्यांनी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी ४० जादा रेल्वेगाडय़ा गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने ७२ रेल्वेगाडय़ा सोडण्याची घोषणा के ली असून त्याच्या आरक्षणाला  प्रतिसाद मिळाला आहे. आणखी ४० किं वा त्यापेक्षा जादा गाडय़ा सोडण्याचाही निर्णय घेतला असून लवकरच त्याची घोषणा होईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.