मुंबई : गोरेगाव येथून दीड कोटी रुपये किंमतीचे हिरे चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सचिन मकवाना याला अटक केली. आरोपीने १० डिसेंबर रोजी सराफाकडील हिऱ्यांची चोरी केली होती. त्यातील ९६ टक्के हिरे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदार किरण रतीलाल रोकानी यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपी मकवानाने तक्रारदाराच्या दुकानातील एक कोटी ४७ लाख ५३ हजार रुपये किमतीचे ४९१.७८ कॅरेट वजनाचे हिरे चोरले होते.

हेही वाचा…आयआरसीटीसीचे संकेतस्थळ पुन्हा बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पोलीस पथकाने गोरेगावपासून गुजरातपर्यंतच्या १२० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले. आरोपीने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी १३ वाहने बदलल्याचे, तसेच आरोपी गुजरातमधील मूळ गाव इंडर येथे गेल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. त्यानंतर तो राजस्थानला पळाला होता. अखेर राजस्थानमधील गडी येथे आरोपीला पकडण्यात आले. त्याच्याकडून रोख रक्कम ७७ हजार रुपये व एक कोटी ४० लाख ७० हजार रुपयांचे हिरे जप्त करण्यात आले.