बांधकाम व्यावसायिक राजाराम मांजवकर (५२) यांच्यावर मंगळवारी सकाळी बोरिवली येथे तीन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. राजाराम मांजवकर हे एसआरए प्रकल्पातील बिल्डर आहेत. बोरिवली पूर्वेच्या देवीपाडा येथील सह्याद्री बिल्डिंगमध्ये त्यांचे कार्यालय आहे. मंगळवारी सकाळी ते आपल्या कार्यालायावळून गाडीतून जात असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला.काही दिवसांपूर्वी आपल्याला धमकी आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी देवीपाडा येथून पॅरोलवर बाहेर असलेल्या प्रमोद नलावडे याला ताब्यात घेतले आहे. बंगळुरू येथील तुरूंगात असलेला छोटा राजनचा हस्तक युसुफ बचकाना हा हल्ल्यामागे हात असल्याचा संशय आहे. तो नलावडेचा मित्र आहे. ज्या ठिकाणी मांजवकर यांचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे.त्या ठिकाणी प्रमोद नलावडे हा वडीलांसह भाडेकरू म्हणून राहात होता. नंतर त्यांच्यात वाद झाला.यावादातून प्रमोदने हल्ल्याचा कट रचल्याचा संशय आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2013 रोजी प्रकाशित
बोरिवलीत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
बांधकाम व्यावसायिक राजाराम मांजवकर (५२) यांच्यावर मंगळवारी सकाळी बोरिवली येथे तीन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. राजाराम मांजवकर हे एसआरए प्रकल्पातील बिल्डर आहेत. बोरिवली पूर्वेच्या देवीपाडा येथील सह्याद्री बिल्डिंगमध्ये त्यांचे कार्यालय आहे.
First published on: 29-05-2013 at 03:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai borivali firing on builder by extortionists