Mumbai Central to Gandhinagar Vande Bharat Express today Prime Minister Narendra Modi Gandhinagar ysh 95 | Loksatta

मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर येथे गाडीला हिरवा कंदिल

‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली  वातानुकूलित ‘वंदे भारत एक्सप्रेस’ पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल-गांधीनगर-मुंबई सेन्ट्रल दरम्यान धावणार आहे.

मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर येथे गाडीला हिरवा कंदिल
वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई : ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली  वातानुकूलित ‘वंदे भारत एक्सप्रेस’ पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल-गांधीनगर-मुंबई सेन्ट्रल दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकात उद्या, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता या गाडीला हिरवा कंदिल दाखवणार आहेत. ही एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. सहा तास २० मिनिटांत मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर कॅपिटल स्थानक प्रवास पूर्ण होणार आहे.

संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या एक्सप्रेसमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोटॉयलेट अशा विविध सुविधा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर अहमदाबाद येथून दुपारी दोन वाजता ती सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ७.३५ वाजता मुंबई सेन्ट्रल टर्मिनसला पोहोचणार आहे. ही एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत येईल. रविवार वगळता उर्वरित सहा दिवस ही गाडी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विकासकाला परस्पर विकलेला माझगावमधील एक एकर भूखंड शासकीय?; जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी प्रलंबित

संबंधित बातम्या

ही ‘राज’नीती मुंबईत कशी जिंकणार?
बाळासाहेबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम जोरदारच करा
मुंबई: एमसीएच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
आयत्या वेळी विषयात अंधेरी आरटीओ प्रकल्प मंजूर!
पंतप्रधान मोदींनी आम्हाला फटकारले नाही; शिवसेनेचा दावा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
बजाओ! भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “लग्नात अशीच नवरी…”
Video: “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी…”, ‘त्या’ टीकेनंतर शिंदे गटातील खासदारांचं जाहीर आव्हान!
“गेली अनेक वर्ष…” प्रथमेश परबच्या वाढदिवशी त्याच्या कथित गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट चर्चेत
FIFA WC 2022: ब्रुनो फर्नांडिसने केलेल्या गोलवर रोनाल्डोचा दावा? Video शेअर करत नेटिझन्सने केले ट्रोल
विश्लेषण : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट व्हल्गर? IFFI मधील विधानांमुळे पुन्हा फुटलं वादाला तोंड; नेमकं झालं तरी काय?