Mumbai Monorail : मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वेसह मोनोरेललाही बसला आहे. मुंबईमधील चेंबूर भक्ती पार्क मार्ग या दरम्यानची मोनोरेल अचानक मध्येच बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.
मोनोरेलमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. जवळपास एका तासांपासून अनेक प्रवासी बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी तात्काळ स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. तसेच मदतीसाठी क्रेन देखील घटनास्थळी दाखल झालं असून प्रवाशांना मोनोरेलमधून बाहेर काढण्यात येत आहे
दरम्यान, बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर येण्यासाठी दरवाजा बंद असल्यामुळे अडचणी येत होत्या. त्यानंतर प्रवाशांनी बाहेर येण्यासाठी काच फोडली. तसेच तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवानांनी मदतीसाठी पोहोचले असून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे. तसेच एक दरवाजा उघडला असून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर येत आहे.
तांत्रिक कारणाने मोनोरेल मध्येच ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु…https://t.co/ZfyIjgJO7V#Maharashtra #mumbai #monorail #MumbaiMonorailStuckOnElevatedTrack pic.twitter.com/rm3bi3x4v8
— LoksattaLive (@LoksattaLive) August 19, 2025
VIDEO | An operation to rescue people is going on as a Monorail gets stuck on elevated track near Mysore Colony in Mumbai's Chembur.
— Press Trust of India (@PTI_News) August 19, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/giZPFHvbLm
घटनास्थळी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासह वैद्यकीय पथक देखील दाखल झालेलं आहे. तसेच जवळच्या महानगरपालिका रुग्णालयालाही सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून तांत्रिक बिघाडामुळे ही मोनोरेल बंद पडल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. जवळपास एका तासांपेक्षा जास्त वेळापासून हे प्रवाशी मोनोरेलमध्ये अडकले होते. मात्र, ही मोनोरेल अचानक कशी बंद पडली? याची चौकशी प्रशासनाकड़ून करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.