ऐन पावसात मुंबई महानगरपालिका, बेस्ट कर्मचारी आणि रिक्षा संघटनेने उद्यापासून २० तारखेपर्यंत संपावर जाण्याचा इशारा केला आहे. त्याचबरोबर अग्नीशमन दलाचे कर्मचारीही संपावर जाणार असल्याचे समजते. प्रशासनाने मागण्या मान्य न केल्याने या तिन्ही व्यवस्थेतील संघटनांनी एकत्र संपावर जाणार असल्याचे ठरविले आहे. येत्या ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हे माहितीअसून सुद्धा पालिकाकर्मचारी, बेस्ट कर्मचारी, रिक्षा संघटना संपावर जाऊन मुंबईकरांना वेठीस धरण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रप्रशासनाने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत अशी या संघटनांची मागणी आहे.
मुंबई पालिकेत एकूण ९१,००० हजारांच्या आसपास कर्मचारी आहेत. एकावेळी एवढे सर्व कर्मचारी संपावर गेल्यास मुंबईकरांना मोठ्या जाचाला सामोर जावे लागू शकते. तसेच दोन लाखांहून अधिक रिक्षाचालक संपावर गेल्यास मुंबईकरांना प्रवासाला त्रास होईल.