हुंड्याच्या गुन्ह्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँ हिचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी मुंबईतील न्यायालयाने फेटाळला. मुंबई पोलीसांनी राधे माँला आधीच समन्स बजावले असून, तिला तातडीने कांदिवली पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले आहे.
सासरच्या कुटुंबियांकडून आपला शारिरीक आणि मानसिक छळ होत असून, त्याला अध्यात्मिक गुरू सुखविंदर कौर उर्फ राधे माँ जबाबदार असल्याचा आरोप निक्की गुप्ता या विवाहितेने केला होता. निक्की हिने दिलेल्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी नुकतीच राधे माँसह सात जणांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. राधे माँ हिला पोलीसांपुढे हजर होण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, तिने पोलीसांकडे अधिक कालावधी मागितला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2015 रोजी प्रकाशित
राधे माँचा अटकपूर्व जामीन मुंबईतील न्यायालयाने फेटाळला
हुंड्याच्या गुन्ह्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँ हिचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी मुंबईतील न्यायालयाने फेटाळला.

First published on: 13-08-2015 at 05:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai court rejects anticipatory bail of radhe maa