मुंबईतल्या लालबागमध्ये आईची हत्या करणाऱ्या मुलीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी या मुलीने असं म्हटलं आहे की मी माझ्या आईचा खून केला नाही. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले असं या मुलीने सांगितलं आहे. आईला मारून तिचे तुकडे का केले? असा प्रश्न न्यायाधीशांनी रिंपल जैनला विचारला. त्यावर मी माझ्या आईची (वीणा जैन) हत्या केली नाही. तिच्या मृतदेहाच तुकडे केले असं रिंपलने न्यायालयात सांगितलं. या प्रकरणात न्यायालयाने रिंपल जैनला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबईतल्या लालबागमध्ये वीणा जैन यांची हत्या ज्या पद्धतीने उघडकीस आली ते पाहून पोलीस आणि रिंपलच्या घराशेजारी राहणारे शेजारीही चकीत झाले होते. कारण रिंपल जैन ही तिच्या आईच्या मृतदेहाच्या तुकड्यांसह तीन महिने राहात होती. तिने आईच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा वास येऊ नये म्हणून २०० परफ्युमच्या बाटल्या ४० एअर फ्रेशनर्स, फिनेलच्या बाटल्या असं सगळं घरात आणलं होतं. या प्रकरणात तिचा भाऊ आठवड्याभरापूर्वी जेव्हा तिला भेटायला गेला होता तेव्हा त्याला दुर्गंधी आली. त्याने वीणा जैन कुठे आहेत हे रिंपलला विचारलं त्यावेळी वीणा जैन कानपूरला गेल्याचं रिंपलने सांगितलं. मात्र घरात एक प्रकारची दुर्गंधी येत असल्याने त्याला संशय आला. त्याने ही बाब पोलिसांना सांगितली. पोलिसांनी रिंपलच्या घराची झडती घेतली असता त्यांना घरात विविध ठिकाणी वीणा जैन यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळले. त्यानंतर रिंपलला अटक करण्यात आली. आता रिंपलने आपण आई वीणा जैनची हत्या केली नसल्याचं म्हटलं आहे.

EX Jharkhand CM Hemant Soren Moves sc for bail
हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकेविरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा आरोप 
nagpur wife murder for 200 rupees marathi news
दोनशे रुपयांसाठी पत्नीची कुऱ्हाडीने केली हत्या, आता मागितली शिक्षेत सुट; न्यायालयाने…
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता
Mumbai News
पत्नीला ‘सेकंड हॅण्ड’ म्हटल्याने न्यायालयाने पतीला ठोठावला तीन कोटींचा दंड

रिंपल जैनने न्यायालयात नेमकं काय सांगितलं?

“२७ डिसेंबर २०२२ ला माझी आई पहिल्या मजल्यावरून खाली पडली. हॉटेलच्या दोन मुलांनी तिला उचलून वर आणलं. आईचा मृत्यू त्याच दिवशी झाला होता. त्यावेळी मला हे वाटलं की आईचा मृत्यू खाली पडून झाला आहे हे सांगितलं तर सगळा आळ माझ्यावर येईल राहते घर आणि आईचे मामाकडे असलेले बँकेतले पैसे मिळणार नाहीत. याच भीतीने मी आईच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि घरात विविध ठिकाणी लपवले.”

१४ मार्चला हा प्रकार आला उघडकीस

वीणा जैन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून रिंपल त्यासोबत तीन महिने राहिली. रिंपलच्या घराची झडती जेव्हा पोलिसांनी घेतली तेव्हा पोलिसांना घरातून इलेक्ट्रॉनिक मार्बल कटर, कोयता, चाकू मिळाले जे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी मुलीने आईच्या मृतदेहाचे धारदार शस्त्राने तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीत ते ठेवले. या पिशव्या कपाट, ड्रम, फ्रिज या ठिकाणी ठेवल्या होत्या. या सगळ्यातून दुर्गंधी पसरू नये म्हणून एअर फ्रेशनर्स, २०० परफ्युमच्या बाटल्या, फिनेलच्या बाटल्या हे सगळं आणलं होतं ही माहिती पोलिसांनी झडतीनंतर दिली.

क्राईम शो पाहून केला गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिंपल क्राईम शो बघत होती. ज्यामुळे तिला गुन्हा करण्यास मदत झाली. पोलिसांनी रिंपलचा मोबाईल जप्त केला आहे. तिने गुगलवर डेडबॉडीचे विघटन कसे करायचे हे शोधले होते. परफ्युम आणि एअर फ्रेशनरचा वापर तिने दुर्गंधी कमी करण्यासाठी केला असंही पोलिसांनी म्हटलं आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.