मुंबईच्या डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं आज (गुरूवार) मनसे प्रमुख राज यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून रेल्वेनं प्रवार करू देण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु रेल्वे प्रशासानानं त्यांची मागणी मान्य केली नव्हती. राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान डबेवाल्यांनादेखील रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं राज ठाकरेंची भेट घेत त्यांना निवेदनही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दोन दिवसांपूर्वी मनसेनं मुंबईत लोकल प्रवास करत सविनय कायदेभंगाचं आंदोलन केलं होतं. बहुतांश मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकलनं प्रवास केला होता. मुंबईतील लोकल सेवा पूर्ववत करावी अशी त्यांची मागणी होती. डबेवाल्यांनी महिनाभरापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मुंबईकरांप्रमाणेच डबेवाल्यांची लाईफलाईनही लोकल रेल्वे सेवा आहे. परंतु रेल्वे प्रशासनानं आमची मागणी मान्य केली नाही,” असं राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलं. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादात याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा- रेस्टॉरंटमध्ये खानपानाला परवानगी द्या, हॉटेल मालकांची उद्धव ठाकरेंना विनंती

“आम्हाला लोकलमधून परवानगी देण्यात येत नाही तर किमान अत्यावश्यक सेवांमध्ये आमची सेवा सामावून घेत प्रवास करू देण्यात यावा अशीही विनंती आम्ही केली होती. परंतु तीदेखील मान्य करण्यात आली नाही. आमची मागणी मनसेनं उचलून धरली आणि त्यांनी आंदोलन केलं. यासाठी आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी आलो आहोत. मनसेनं आदोलन करून वात पेटवली आहे. त्याचा भडका केव्हाही होऊ शकतो. थोड्याफार प्रमाणात तरी सरकारनं सेवा सुरू करावी,” असंही यावेळी सांगण्यात आलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai dabbewala delegation met mns chief raj thackeray local train travelling lockdown jud
First published on: 24-09-2020 at 11:57 IST