माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीने बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. दरम्यान, गुरुवारी (१८ एप्रिल) पंकजा मुंडे यांनी बीडमधील प्रचारसभेत मोठं वक्तव्य केलं होतं. पंकजा मुंडे नागरिकांना उद्देशून म्हणाल्या, ही निवडणूक आपल्या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून योगदान द्या. मी लोकसभेवर गेल्यावर आपल्या मतदारसंघाचा आजवर झाला नाही तितका विकास करेन. त्यानंतर पुढच्या पाच वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला आपण खासदार करू. परंतु, जिल्ह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही. यावेळी मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा. कारण ही पाच वर्षे जिल्ह्याच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत.

पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या होत्या की, “सर्व समाजाच्या लोकांना, मराठा, बौद्ध, मातंग आणि मुस्लीम किंवा इतरांनाही मी एवढंच सांगेन की ही निवडणूक कशाची आहे हे लक्षात घ्या. ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या अस्मितेची आहे. आपल्या जिल्ह्याला यशाच्या उंचीवर नेण्याची ही निवडणूक आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत, त्या गोष्टीत राजकारण आणण्याचं काही कारण नाही. मी कितीही भाषणं केली, बेमुदत उपोषणाला बसले तरी कायदा बदलत नसतो. कायद्याने जे मिळणार आहे त्याच्यासाठी निवडणुकीत राजकारण आण्याचं कारण नाही.” पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की, त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी जरांगेंचा नामोल्लेख टाळत ही टीका केली आहे.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!

दरम्यान, यावर आता पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, बिचाऱ्या गरिबांसाठी लढणाऱ्या माणसाविरोधात मला काही बोलायचं नाही, मी त्यांच्याविषयी काहीच बोलले नाही. परंतु, काही लोकांनी आगाऊपणा करून मी मनोज जरांगे पाटलांवर टीका केल्याची बातमी पसरवली.

हे ही वाचा >> छ. संभाजीनगर लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला, चंद्रकांत खैरेंविरोधात ‘हा’ शिवसैनिक मैदानात!

पंकजा मुंडे आज (२० एप्रिल) बीडमधील एका प्रचारसभेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या, तुम्ही गेली इतकी वर्षे माझ्याबरोबर आहात. तुम्ही मला इतक्या वर्षांपासून भाषण करताना पाहिलं आहे. हे मीडियावालेदेखील माझ्याबरोबर फिरतात. मी कधी कोणाविरोधात अशी टीका केली आहे का? मी परवा कुठल्यातरी वेगळ्याच विषयावर बोलत होते. मात्र कोणीतरी आगाऊपणा केला आणि म्हणाले की, मी जरांगे पाटलांवर टीका केली. खरंतर मी मनोज जरांगेंचं नावच घेतलं नव्हतं. गेल्या कित्येक दिवसांत मी कुठेही त्यांचा नामोल्लेख केलेला नाही. मी कधीच कोणावर अशा पद्धतीने टीका केली नाही आणि टीका केलीच तर ही पंकजा गोपीनाथ मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे, मी शब्द मागे घेत नसते. मला ज्याला बोलायचं आहे मी त्याला थेट बोलते. जो माणूस बिचाऱ्या गरिबांसाठी लढतोय त्या माणसाविरोधात मला बोलायचं नाही. मी त्यांच्याविषयी काही बोललेच नाही. जो कोणी वंचित आहे मी त्यांच्या बाजूने आहे. मी हिंदू, मुसलमान, बहुजन, ओबीसी, ब्राह्मण या गोष्टी पाहत नाही आणि वंचितांच्या बाजूने उभी राहायला घाबरत नाही.