मुंबई : मालाड येथील २६ वर्षीय डॉक्टरने ऑनलाइन मागवलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना घडली होती.
तो बोटाचा तुकडा पुण्यातील आईस्क्रीम कारखान्यातील कामगाराचा असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. ११ मे रोजी अपघातात त्याचे बोट कापले होते.
हेही वाचा…मुंबईत पावसाची संततधार
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ओमकार पोटे (२४) असे कामगाराचे नाव असून तो मूळचा साताऱ्याचा आहे. तो पुण्यातील इंदापूर येथील आईस्क्रीम कारखान्यात कार्यरत आहे. तो ११ मे रोजी या अपघातानंतर रुग्णालयात भरती झाला होता. आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा पोलिसांनी तपासणीसाठी न्यायवैद्याक प्रयोगशाळेत पाठवला होता. डीएनए चाचणीत तो बोटाचा तुकडा पोटे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.