प्रभादेवी येथील बेस्टच्या विद्युत उप केंद्रात शनिवारी दुपारी आग लागली होती. तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवले. विद्युतपुरवठ्यात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.
बेस्ट विद्युत उप केंद्रात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

हेही वाचा >>> मुंबई : गणेश विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

क्षणाक्षणाला आग पसरत होती. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, बेस्टच्या विद्युत उप केंद्रा उष्णता वाढलील्याने अचानकपणे आग लागली असावी, असे अग्निशमन दलातील सूत्रांनी सांगितले.