मुंबईच्या मालाड येथील मामलेदार वाडी परिसरातील एका तीन मजली प्लास्टिकच्या गोदामाला आग लागल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही वेळामध्ये घटनास्थळी धाव घेतली व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग नेमकी कशी लागली? याची माहिती मिळू शकलेली नाही.
Mumbai: A level-3 fire broke out in a closed godown at Mamledar wadi in Malad West, earlier tonight. 8 fire tenders are present at the spot. No injuries have been reported. Fire fighting operations are underway. #Maharashtra pic.twitter.com/IcfQSqyRrp
— ANI (@ANI) November 5, 2019
प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी आठच्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
