मुंबई : भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता नांदावी आणि तेथे तैनात जवानांना गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी गेल्या १३ वर्षांपासून काश्मीरमधील पूंछ गावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्याविहार येथील एका गणेश कार्यशाळेत साकारलली सहा फूट उंचीची गणेशमूर्ती सोमवारी पहाचे पूंछला रवाना झाली. पूछ गावातील एका प्राचीन शिव-दुर्गा मंदिरामध्ये २०१० पासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

पूंछ पंचक्रोशीत सामाजिक कार्य करणाऱ्या ईशर दीदींचा गणेशोत्सवाच्या आयोजनात मोठा वाटा आहे. भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर हे गाव आहे. त्यामुळे अधूनमधून या परिसरात बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येत असतो. या ठिकाणी शांतता नांदावी या उद्देशाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील जवान तैनात आहेत. गणेशोत्सवादरम्यान त्यांना आपल्या घरी जात येत नाही. त्यामुळे ते याच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात.

हेही वाचा : अकरावी प्रवेश : पाचवी विशेष प्रवेश यादी जाहीर; दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्याविहार येथील सिद्दीविनायक कला मंदिरात मूर्तिकार विक्रांत मांढरे गेल्या १३ वर्षांपासून ही सहा फुटांची गणेशमूर्ती साकारत आहेत. ही गणेशमूर्ती सोमवारी पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक्स्प्रेसने काश्मीरला रवाना झाली. पुढे पुछ गावापर्यंत भारतीय सौनिक आपल्या वाहनातून ही मूर्ती पूंछ गावात घेऊन जाणार आहेत. गावकऱ्यांसह सीमेवरील तैनात जवान मोठ्या संख्येने या गणेशोत्सवात सहभाग होतात. अकराव्या दिवशी गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढून पूलस्त नदीमध्ये विसर्जन करण्यात येते.