Mumbai Girl Suicide : मुंबईतल्या पार्ले येथील प्रसिद्ध साठ्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत या मुलीने आयुष्य संपवलं आहे. या मुलीचे नाव संध्या पाठक असे होते. ती 21 वर्षांची असून ती साठ्ये महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. आज सकाळी संध्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर साठ्ये कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली. IANS या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. तसंच पीटीआयनेही ही माहिती दिलीआहे.

प्राथमिक माहितीनुसार, संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. या घटनेनंतर पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. संध्या पाठक ही तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर तिला तातडीने बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. साठ्ये कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली ती मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट ची होती. फर्स्ट ते थर्ड इयर कॉलेजचे लेक्चर सकाळी सात वाजल्यापासून सुरू होतात. मात्र या वेळांमध्ये गर्दी कमी असते कॉलेजमध्ये कारण नेमकीच मुलं येतात. संध्याच्या आत्महत्या प्रकरणानंतर साठ्ये महाविद्यालयाच्या इमारतीत जाणयासाठी एकच प्रवेश सुरु ठेवण्यात आला आहे. आज सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संध्याच्या कुटुंबाने काय संशय व्यक्त केला आहे?

साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या कुटुंबीयांनी ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याचे सांगितले. तिने आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक शक्यता आहे. मात्र, संध्याच्या कुटुंबीयांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. तिला कोणीतरी ढकलेले असावे, असे संध्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.