scorecardresearch

Premium

Goregaon Building Fire : मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदत जाहीर, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

गोरेगावमधील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Gotegaon Fire
मुंबईतल्या गोरेगावमधील इमारतीला भीषण आग लागून मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. (PC : Indian Express Gujarati)

मुंबईतल्या गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या आगीत जखमी झालेल्या नागरिकांवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील, असंही राज्य सरकारने जाहीर केलं आहे. या दुर्घटनेप्रकरणी सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो.

या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त वेळोवेळी माहिती घेत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी, तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

police leave encashment
रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप
election commission order maharashtra government to transfer ias officers who completed three years
तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे यांना आदेशाचा फटका
Student molestation case thane
विद्यार्थी विनयभंग प्रकरण : भाजपचे पदाधिकारी गोएंका शाळेत शिरताच पालकांचा विरोध
investors lost Rs 3 79 lakh crore due to drop in government companies shares
सरकारी कंपन्यांच्या समभागातील घसरणीने गुंतवणूकदारांना ३.७९ लाख कोटींची झळ

हे ही वाचा >> डीनला संडास साफ करायला लावण्याच्या घटनेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “मस्तवाल, गद्दार खासदाराने…”

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “गोरेगावमध्ये एसआरएची जय भवानी इमारत आहे. त्या इमारतीत आग लागली आहे. मी सातत्याने महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत आहे. मी त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये कागद आणि कापडाचे गठ्ठे होते. त्यामुळे आग लागली असं प्राथमिक स्तरावर निदर्शनास आलं आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai goregaon fire rs 5 lakh assistance from state government to family of who died asc

First published on: 06-10-2023 at 13:43 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×