scorecardresearch

मुंबई : कॅटरिंगच्या कामावरून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

मुलीने बाहेर येऊन आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली.

Rape sexual assault abuse
(प्रातिनिधिक छायाचित्र)

गोवंडी शिवाजी नगर परिसरात एक अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. कॅटरिंगच्या कामावरून ही मुलगी घरी परतत होती. या वेळी या टोळक्याने त्या तरुणीला पकडले आणि बाजूला असलेल्या एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पळ काढला. मुलीने बाहेर येऊन आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांनी दहा पथके तयार केली असून आरोपींचा शोध घेत असून यासंदर्भात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“सकाळी साडेचारच्या दरम्यान, एक महिला रोड नंबर १३ येथील बस डेपोच्या जवळून जात असताना चार ओळखीचे लोक तिला भेटले होते. त्यातील एकाने काहीतरी बोलायचे आहे म्हणत एका खोलीत नेले. त्यानंतर बाकीचे तीन जण गेले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांची १० पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यातील दोन आरोपींना अटक केली असून दोघेही अल्पवयीन आहेत,” अशी माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रकाने यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai govandi shivajinagar gang rape of a minor girl returning from catering work abn

ताज्या बातम्या