पुणे येथील अभियंता मोहसीन शेख याच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी आणि हिंदू सेनेचा नेता धनंजय देसाई याच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत आणि सगळे प्रतिकूल पुरावे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले आहेत. विशेष म्हणजे आरोपीला धर्माच्या नावाने चिथवण्यात आल्याचे नमूद करत  या प्रकरणातील सहआरोपीला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या या मतानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्यावर ठेवण्यात आलेला खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप रद्द करण्याची मागणी कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्याविरोधात त्याने ही याचिका केली असून न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्यासमोर त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी या हत्याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही तसेच आरोपपत्रात केवळ चारवेळाच आपल्या नावाचा उल्लेख झालेला आहे. त्यामुळे आपल्याला याप्रकरणी आरोपी करण्यात आल्याचा दावा देसाई याच्या वतीने करण्यात आला. आपण शिवाजी महाराजांची थोरवी सांगणारी भाषणे दिली आहेत. मात्र ही भाषणे जानेवारी व मार्च २०१४ मध्ये देण्यात आली होती. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि मोहसीनचा खून गेल्या वर्षी जूनमध्ये झाला होता. शिवाय घटनास्थळी उपस्थित होतो वा अन्य आरोपींच्या संपर्कात होतो हा खुद्द पोलिसांही दावा नाही,  असा दावाही त्याच्यातर्फे करण्यात आला. आपण मोहसीनला ओळखत नव्हतो आणि आपण पूर्णपणे निर्दोष असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर देसाई याच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत आणि सगळे प्रतिकूल पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.

आरोपीला धर्माच्या नावाने चिथवण्यात आल्याचे नमूद करत या प्रकरणातील सहआरोपीला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या या मतानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court
First published on: 02-02-2017 at 01:38 IST