मुंबईः वाहतूक शाखेचे पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांना एका अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी करून आपण आमदार यशवंत माने असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीने मिरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी सीआययू अधिक तपास करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई : रखडलेले ५१७ ‘झोपु’ प्रकल्प मार्गी लागणार; झोपु प्राधिकरणाकडून ९० विकासकांची यादी तयार

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांच्या मोबाइलवर एका अनोळखी तरुणाने दूरध्वनी केला होता. आमदार यशवंत माने बोलत असून मिरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे हा दूरध्वनी आमदार यशवंत माने यांच्या मोबाइल क्रमांकावरून आसल्याचे भासवण्यात आले होते. त्यासाठी आरोपीने तंत्रज्ञानाची मदत घेतल्याचा आरोप आहे. ही बाब पडवळ यांनी मुंबई आणि मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला कळवली. पोलिसांनी दूरध्वनी करणाऱ्याशी संपर्क साधला; मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सीआययूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत यांच्या तक्रारीवरून गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सीआययू अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai joint police commissioner gets fake mla call with bomb threat in mira bhayandar mumbai print news zws
First published on: 16-02-2023 at 17:07 IST