मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग आणि हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे टर्मिनस दोन्ही मार्गावर स.११.१५ ते दु.३.१५ वाजेदरम्यान ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल गाडय़ा उशिराने धावतील. याशिवाय मध्य रेल्वेच्याच  कल्याण ते कसारा अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लॉकमुळे  सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल दिवा ते परळ दरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद व अर्ध जलद लोकल गाडय़ांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर्स गाडी दिवा स्थानकापर्यंतच धावेल. तर दिवा स्थानकातूनच रत्नागिरीसाठी गाडी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी दादर स्थानकातून दुपारी ३.४० वाजता विशेष लोकल सोडण्यात येईल.

कल्याण ते कसारा मार्गावर ब्लॉक

शहाडमधील पुलाचे गर्डर पाडणे, टिटवाळा स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकणे, आसनगावमधील पादचारी पूल पाडणे, तानशेत स्थानकात नवीन पादचारी पुलाच्या कामांसाठी रविवारी कल्याण ते कसारा दरम्यानही अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान अप व डाऊन मार्गावरील गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ९.१२ वाजताची टिटवाळा, स. ८.३३ ची कसारा, दु. ३.३० वा आसनगाव, स.१०.३७, स.१०, ८.१८, दुपारी २.४४ आणि दुपारी ३.३५ वाजताची सीएसएमटी लोकल रद्द राहतील, असे सांगण्यात आले.

नेरळ ते माथेरान दरम्यान सोमवारपासून ब्लॉक

नेरळ ते माथेरान दरम्यान २० मे पासून ते अनिश्चित काळापर्यंत दररोज सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान नेरुळहून सुटणारी सकाळी ८.५० वा आणि  माथेरानहून सकाळी ९.२० वाजता सुटणारी ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local mega block
First published on: 19-05-2019 at 09:02 IST