मुंबई : आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे उशिराने धावणार

(संग्रहित छायाचित्र)

विविध तांत्रिक कामांसाठी आज (दि.२२) सप्टेंबरला मध्य रेल्वे मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्ग व पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल ते माटुंगा अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरी रेल्वे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे – मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग

कधी – स. ११.१५ ते दु. ३.४५ वा

परिणाम – कल्याणपासून सुटणाऱ्या जलद गाडय़ा दिवा ते परळ दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. धीम्या मार्गावरील उपनगरी रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातच थांबवण्यात येणार असून दिवा स्थानकातूनच रत्नागिरीसाठी सोडली जाईल.

हार्बर मार्ग

कुठे – कुर्ला ते वाशी दोन्ही मार्ग

कधी – स. ११.१० ते दु. ३.४० वा.

परिणाम – ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्या येतील.

पश्चिम रेल्वे

कुठे – मुंबई सेन्ट्रल ते माटुंगा अप व डाऊन जलद मार्ग

कधी – स. १०.३५ ते दु. २.३५ वा.

परिणाम – दोन्ही जलद मार्गावरील गाडय़ा सांताक्रुझ ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान धीम्या मार्गावर धावतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai local mega block updates sas 89

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या