मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्य प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी सुमारे ९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. मानसोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा फायदा होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक संशोधन व सखोल अभ्यास करता यावा यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मानसिक आरोग्य प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसोपचार विभागाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमातील अभ्यासावर आधारित आणि मानसोपचार विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मानसिक आरोग्य प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा : तक्रारींची दखल घ्या, पण उत्तर वा सुनावणीस बंधनकारक नसावे, मुंबई महानगरपालिकेचा फतवा

हेही वाचा : मुंबई-गोवा विशेष रेल्वेगाड्या धावणार, मुंबईकरांना गोव्यातील नववर्षाच्या जल्लोषात सहभागी होता येणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. एका प्रयोगशाळेसाठी अंदाजित चार कोटी ७१ लाख ७३ हजार २८० रुपये खर्च करून यंत्रसामग्री खरेदी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामुग्री खरेदीसाठी राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ९९ कोटी ६ लाख ३८ हजार ८८० रुपयांना मंजुरी दिली आहे. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या या प्रयोगशाळेमुळे मानसोपचाराचे शिक्षण घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा लाभ होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवणे आणि संशोधन करण्यास मदत होणार आहे.