मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. मेट्रोच्या प्रवासी भाड्यात पाच रुपयांची तर मासिक पासात देखील ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-मेट्रोचा एसीयुक्त प्रवास मुंबईकरांसाठी चांगलाच महाग होणार आहे. ही भाडेवाढ येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.
सध्या वर्सोवा ते घाटकोपर या दरम्यानच्या तिकिटाचे दर १०,२०,३० आणि ४० रुपये इतके आहेत. त्यात वाढ होऊन आता हे दर १०,२०,२५,३५ आणि ४५ असे होणार आहेत. तर, मेट्रोचा मासिक पास दोन टप्प्यात मिळतो. त्यातील पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी ६७५ रुपयांऐवजी आता ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, दुसऱया टप्प्यातील प्रवासासाठी ७२५ रुपयांऐवजी ९५० रुपये प्रवाशांना मोजावे लागतील.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2015 रोजी प्रकाशित
मेट्रोच्या प्रवासी भाड्यात पाच रुपयांची वाढ, मासिक पासही महागला
मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 27-11-2015 at 20:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro fare hike