मुंबई : मुंबई महानगरपालिकेत लवकरच सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार आहे. सहायक सुरक्षा अधिकारी (६५ पदे) आणि सुरक्षा अधिकारी (१४०० पदे) आदी रिक्त जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून भरती प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, अशी घोषणा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केली.

मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा ५८ वा वर्धापन दिन शुक्रवारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडूप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. त्यावेळी शिंदे यांनी ही घोषणा केली. यावेळी एस विभागाचे सहायक आयुक्त भास्कर कसगीकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सुरक्षा दलामार्फत संचलन, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच विशेष कामगिरी बजावणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
chhagan bhujbal, armstrong company
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग
Buldhana, Buddhist International Network, Grand March, Mauryan Era Buddha Stupa, Destruction,
‘बुद्धिस्ट इंटरनॅशनल’च्या मोर्च्यात एकवटला आंबेडकरी समाज; महिला, भिक्कुसंघाचा लक्षणीय सहभाग
navi mumbai, environmentalist protest,
नवी मुंबईतील कांदळवन, पाणथळ जागा वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले, चाणक्य तलावाजवळ केले आंदोलन

हेही वाचा – मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान

मुंबईतील विविध ठिकाणी सेवा बजावणाऱ्या सुरक्षा दलासाठी अद्ययावत सेवा व सुविधा, तसेच गणवेश, आवश्यक उपकरणे आदी पुरविण्यात येतील, असे डॉ. सुधाकर शिंदे यावेळी म्हणाले. घनकचरा विभाग, तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभाग यासारख्या विभागांमध्ये अनेकदा सुरक्षा कर्मचारी वर्गाला डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यामुळे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या क्षेत्रात जवळपास ७०० चौक्यांच्या ठिकाणी कीटकनाशक संयंत्रे बसविण्यात येणार आहेत. एकूण सात ते दहा टप्प्यात ही संयंत्रे उपलब्ध केली जातील, अशी माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी यावेळी दिली.

रूग्णालयात सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर

महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय (के. ई. एम.), लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय (शीव रुग्णालय), बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कुपर रुग्णालय या प्रमुख चार रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयातील नातेवाईकांचे साहित्य व मोबाइलच्या चोरीची प्रकरणे कमी झाली आहेत. रुग्णालयाच्या परिसरातील जमाव, आगीसारख्या दुर्घटनांची माहिती या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. तसेच अग्निशमन दलालाही या कॅमेऱ्याचा वापर करून सतर्क करणे शक्य आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – १७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई

ई – बटवडा प्रणालीचा वापर होणार

प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या मोबाइलमध्ये ई – बटवडा या मोबाइल ॲपचा वापर येत्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. तसेच या मोबाइल ॲपचा वापर प्रत्येक सुरक्षा रक्षकाला आपल्या कामाचे ठिकाण कळण्यासाठी तसेच उपस्थिती लावण्यासाठी होणार आहे. त्यासोबतच एखादा मोर्चा किंवा जमाव याबाबतची माहिती देण्यासाठी ॲपचा वापर करता येईल. आपत्कालीन प्रसंगी थेट प्रक्षेपण (लाईव्ह) करण्याची, तसेच दृकश्राव्य चित्रिकरण (व्हिडिओ शूट) करण्याची सुविधा देखील या ॲपमध्ये आहे.