बहुप्रतिक्षीत मोनोरेलच्या चाचणीचा गुरुवारी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आणिक- वडाळा मार्गावर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुखरूप उतरवण्याची कसरत अग्निशमन दल व पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली. मोनोरेलची प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी आपत्कालीन चाचणी हा टप्पा महत्त्वाचा होता.
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या सुमारे २० किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल धावणार आहे. त्याचा पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा असा ८. ८ किलोमीटर लांबीचा आहे. जानेवारी २०१४ पर्यंत हा टप्पा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. गुरुवारी मोनोरेलमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘प्रवासी’ म्हणून बसवण्यात आले. काल्पनिक आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दलाला दूरध्वनी करण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तेथे दाखल झाले व कुठल्याही सार्वजनिक सुविधांना बाधा न पोहोचवता त्यांनी ‘प्रवाशांना’ सुखरूपपणे खाली उतरवले. तब्बल दोन तास ही ‘मॉक ड्रिल’ चालली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2013 रोजी प्रकाशित
मोनो आपत्कालीन चाचणीतून पार
बहुप्रतिक्षीत मोनोरेलच्या चाचणीचा गुरुवारी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आणिक- वडाळा मार्गावर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुखरूप
First published on: 15-11-2013 at 05:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai monorail pass disaster test