मुंबई : चांदिवली परिसरातील संघर्ष नगर येथील नागरिकांना पुढील आठवड्यात चार – पाच दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे लागणार आहे. महानगरपालिका उद्यान येथील उदंचन टाकीतून मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ पासून पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्यानंतर चार – पाच दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे लागणार आहे.
चांदिवली – संघर्ष नगरमधील रहिवाशांसाठी मुंबई महानगरपालिकेने विजय अग्निशमन मार्गावरील महानगरपालिका उद्यान येथे नवीन उदंचन टाकी उभारली आहे. या उदंचन टाकीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या उदंचन टाकीतून मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ पासून संघर्ष नगर येथील इमारत क्रमांक ९, १०, ११, १२, १३ आणि १३ अ ला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दररोज दुपारी १२.०० ते दुपारी ४.०० ही पाणीपुरवठ्याची नियमित वेळ आहे. नवीन उदंचन टाकीतून पाणीपुरवठा केला जाणार असून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील चार ते पाच दिवस पाणी उकळून – गाळून प्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.