मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदानातील माती काढण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर मुंबई महापालिकेने आता या ठिकाणी माती काढण्यासाठी दोन यंत्रे उपलब्ध केली आहेत. मात्र दिवसा मैदानात सुरू असलेली उन्हाळी शिबिरे, क्रिकेटचे सामने यामुळे कामावर मर्यादा येत आहेत.

आता, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर १ मे रोजी होणाऱ्या पोलीस परेडचा सरावही सुरू झाला आहे. त्यामुळेही माती काढण्यास पुरेशी जागा मिळत नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पोलीस परेडसाठी दरवेळेप्रमाणे अतिरिक्त माती आणून मैदानात टाकू नये, अशा आशयाचे पत्र पालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला लिहिले आहे.

vijay wadettiwar
Vijay Wadettiwar : “महायुतीचा भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर”; शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Youth murder in Panchvati, Nashik,
नाशिक : पंचवटीत युवकाची हत्या, महिलेकडून दोन लाखाची सुपारी, चार जण ताब्यात
The result of the bandh in the western part of Malegaon to protest the atrocities against Hindus in Bangladesh nashik
मालेगावातील पश्चिम भागात बंदचा परिणाम
maratha activist
Supriya Sule : मोठी बातमी! लातूरमध्ये सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, व्यासपीठावर गेले अन्…
Supriya Sule, tuljapur, ladki bahin yojana
लोकसभेच्या अपयशामुळेच लाडकी बहीण योजना, शिवस्वराज्य यात्रेत सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका
Aarey Police prohibits celebration of World Tribal Day in Aarey Mumbai news
World Tribal Day: आरेमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास मनाई ?
nashik theft at former corporator
नाशिक : माजी नगरसेविकेच्या घरी चोरी, एक कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास

हेही वाचा : मैदान निसटू न देण्यासाठी मोदींच्या सभांवर सभा!

शिवाजी पार्कमधील उडणाऱ्या धुळीचा विषय निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच तापला आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने दिल्यानंतर पालिका प्रशासनाने याविषयी आपली भूमिका मांडली आहे. पालिकेच्या जी उत्तर विभागाने १३ एप्रिलपासून या मैदानातील माती काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र गेल्या नऊ दिवसांत मैदानातील एका छोट्याशा भागातील मातीही काढण्यात आलेली नाही. सध्या मैदानाच्या उत्तर दिशेला असलेल्या स्काऊट हॉलपासून ते राजा बढे चौकापर्यंतच्या ३० चौरस मीटर भागातील माती काढली जात आहे.

मात्र, हा वेग अतिशय कमी असल्याचे रहिवासी संघटनेचे म्हणणे आहे. आता पोलीस परेडचे कारण पालिका प्रशासनाकडून दिले जात असले तरी पोलीस परेडचा सराव सकाळी सुरू असतो मग नंतर ताबडतोब काम का सुरू करत नाही, असा सवाल संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी केला आहे.

हेही वाचा : संविधान बदलाची चर्चा हा बाबासाहेबांचा अपमान; रामदास आठवले यांचा आरोप, दलित मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा 

याबाबत जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माती काढण्याचे काम सुरू असून सध्या वापरण्यात येत असलेल्या यंत्राची क्षमता दोन ते अडीच मेट्रिक टनाची आहे. हे यंत्र माती शोषून घेते व बाजूला असलेल्या नाना नानी पार्कात नेऊन टाकली जाते. अशा दिवसभरात चार-पाच फेऱ्यांमधून सुमारे १० मेट्रिक टन माती काढली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता दोन यंत्रे वापरण्यास सुरुवात केल्यामुळे हे प्रमाण दुप्पट होईल. काढलेली माती टाकण्यासाठी मुंबईत दोन ठिकाणी उद्यानात जागा दिली आहे. काढलेली माती झाकून वाहून नेणे आणि तिथल्या उद्यानात टाकणे याकरिता वेळ लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क मैदानात पोलिसांची परेड आयोजित केली जाते. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे परेडसाठी या मैदानात माती आणून टाकली जाते. ही माती तिथे तशीच राहते. वर्षानुवर्षे ही माती साठलेली असल्याचे बेलवडे यांनी सांगितले.