मुंबई : करदात्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराच्या पावत्या घेऊन या, असे फर्मान प्रशासनाने करनिर्धारण आणि संकलन विभागातील निरीक्षकांना दिले आहेत. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी धावपळ करीत असलेल्या निरीक्षकांना आता कर भरणा केलेल्या करदात्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून पावत्या गोळा कराव्या लागणार आहेत. परिणामी, निरीक्षक वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

देशभरात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर महानगरपालिकेच्या महसुलाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद करण्यात आला. त्यानंतर महापालिकेला मोठा महसूल मिळवून देणाऱ्या मालमत्ता कराला महत्त्व आले. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेने मालमत्ता करापोटी चालू आर्थिक वर्षामध्ये (२०२३-२४) चार हजार कोटी रुपये महसूल मिळविण्याचे उद्दीष्ट्य निश्चित केले आहे. मात्र आतापर्यंत मालमत्ता करापोटी केवळ ६४१ कोटी रुपये महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

हेही वाचा : नापास झाल्यामुळे पळालेली मुले मुंबई विमानतळावर सापडली, ‘एआय’च्या मदतीने करायचा होता व्यवसाय

महापालिकेच्या छापखान्यात छापण्यात येणारी मालमत्ता कराची देयके विभागवार वितरीत करण्यात येतात. त्यानंतर करनिर्धारण आणि संकलन विभागातील संबंधित विभाग निरीक्षक देयकांची पडताळणी करून टपाल खात्यामार्फत करदात्यांना पाठविण्यात येत होती. मात्र मालमत्ता कराची २०२३-२४ या वर्षातील देयके निरीक्षकांना ऑनलाईनच्या माध्यमातून पाठविण्यात आली. प्रत्येक विभाग निरीक्षकाच्या हद्दीतील मोठ्या रकमेची १०० देयकांची प्रत काढून करदात्याला घरपोच करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार विभाग निरीक्षकांनी ऑनलाईन देयकाची प्रत काढून संबंधित करदात्याच्या घरी पोहोचविली. मात्र वाढीव रकमेची देयके हाती पडताच करदात्यांचा गोंधळ उडाला. असे असतानाही काही करदात्यांनी देयकाची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा केली. आता या वाढीव देयकांवरून वाद निर्माण झाला असून कराचा भरणा केलेले करदाते गोंधळात पडले आहेत.

हेही वाचा : मुंबई : महापालिकेचे अधिकारी एवढे अतार्किक कसे ? पदपथावरील बोलार्डमधील कमी अंतरावरून उच्च न्यायालयाने फटकारले

वाढीव रकमेच्या देयकांमुळे निर्माण झालेला गोंधळ निस्तरण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात करनिर्धारण आणि संकलन विभागाने मंगळवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक आयोजित केली होती. घरपोच केलेली देयकांची रक्कम भरणाऱ्या करदात्याकडून पैसे भरल्याची पावती घेऊन येण्याचे फर्मान या बैठकीत सोडण्यात आले. घरोघरी जाऊन करदात्यांना देयके देणाऱ्या विभाग निरीक्षकांना करदात्यांकडून पैसे भरल्याच्या पावत्या आणाव्या लागणार आहेत. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट्य मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी निरीक्षक सुट्टीच्या दिवशीही काम करीत आहेत. आता पावत्या गोळा करण्यासाठी त्यांना करदात्यांच्या घरी खेटे घालावे लागणार आहेत. या प्रकारामुळे विभाग निरीक्षकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे महापालिकेतील कर्मचारी संघटनाही आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, किती करदात्यांनी मालमत्ता करापोटी रोख रक्कम भरली, ती किती आहे आदी माहिती मिळावी यासाठी पैसे भरल्याच्या पावत्या आणण्याची सूचना विभाग निरीक्षकांना करण्यात आली आहे, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.