मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयात पाच वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या २६ वर्षीय तरूणाला भोईवाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – दादरमध्ये वृद्ध पित्याकडून तरुणाची हत्या

हेही वाचा – गोरेगावमध्ये डंपरच्या धडकेत १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित मुलीच्या आजीने याप्रकरणी तक्रार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक १३ येथील मोकळ्या जागेत आरोपीने पीडित मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी तिला चायनीज खाण्यासाठी जबरदस्तीने बाहेर घेऊन जात होता, अशी तक्रार पीडित मुलीच्या आजीने केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७५ व पोक्सो कायदा कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.