मुंबई : मासेमारी नौकेवरील खलाश्यांना ओलीस ठेवणाऱ्या ९ सोमालियन चाच्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. भारतीय नौदलाने विशेष मोहिम राबवून त्यांच्या ताब्यातून २३ खलाश्यांची सुटका केली होती. भारतीय नौदलाकडून समुद्रातून चालणारे व्यापारी जहाज व त्यावरील नाविकांना यांची सुरक्षेसाठी गस्त घातल असताना २८ मार्चला आय. एन. एस. त्रिशुल व नौदलाचे जहाज सुभेदा यांना इराणमधील मासमेमारी नौकेचा चाच्यांनी ताबा घेतला असून सर्व खलाश्यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार २९ मार्चला पहाटे तीनच्या सुमारास आय. एन. एस. त्रिशुल व नेव्हल शिप सुभेदा सोमालियाच्या हद्दीतील १०५ सागरी मैल अंतरावर गेले. यावेळी नौका थांबवून ओलिस ठेवलेल्या खलाश्यांची सुटका करण्याचा इशारा भारतीय नौदलाकडून देण्यात आला. पण चाच्यांनी नौदलाचे ऐकले नाही.

खलाश्यांची सुटका कशी झाली?

आय एन एस सुमेधा या युद्ध नौकेने जाऊन मोबाईल ब्रॉडकास्ट यंत्रणेद्वारे चाच्यांशी संपर्क साधून त्यांना इशारा दिला. त्यामुळे घाबरलेल्या चाच्यांनी खलाश्यांना समोर करून आपण शरण येत असल्याचे कळवले. त्यानंतर चाच्यांनी त्यांच्याकडील शस्त्रे पाण्यात फेकली. त्यानंतर नौदलाचे जवान संबंधित नौकेवर उतरले. तपासणी नौकेवर नऊ चाचे सापडले. नौदलाने नौकेवरील २३ खलाश्यांची सुटका केली. ते सर्व पाकिस्तानी नागरिक होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता चाच्यांकडे एके ४७ रायफल हॅन्डग्रेनेड व रॉकेट लॉन्चर होते आणि ते जबरदस्तीने त्यांच्या मासेमारी नौकेवर चढले. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांंना बंदी बनवले. नौकेच्या पाहणीत एके ४७ रायफलचचे ७२८ जिवंत काडतुसे तसेच एक जीपीएस डिव्हाईस, आठ मोबाईल संच इत्यादी साहित्य जप्त केले.

हेही वाचा – नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला

सोमालियन चाच्यांनी ताब्यात घेतलेली इरानियन देशाची मासेमारी नौका व त्यावरील २३ खलाश्यांकडे चौकशी करून त्यांना सोडून दिले आणि एकूण ९ सोमालियन चाच्यांना यलोगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याविरोधात अपहरणासह पारपत्र अधिनियम, परकीय नागरी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पर्यावरणाचा समावेश करावा, पर्यावरणप्रेमींचे निवडणूक आयोगाला पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटक आरोपींची नावे

जेली जामा फराह (५०), अहमद बशीर उमर (४२), अब्दीकरिन मोहम्मद शायर (३४) अदान हसन वारमासे (४४), मोहम्मद अब्दी अहमद (३४), अब्दीकादिर मोहम्मद अली (२८), अयदिद मोहम्मद जिमले (३०), यासीन अदान (२५) व जामा सैद एल्मी (१८)