एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातनंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण चर्चेत आलं आहे. या अहवालावर भूमिका मांडताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांचं खच्चीकरण व बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असं म्हटलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून सिंग यांची बदनामी केली जात असल्याचं समोर आलं. याप्रकरणी मुंबई सायबर सेलनं दोन गुन्हे दाखल केले आहेत.
सायबर सेलच्या पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर यांनी याविषयी माहिती दिली. “ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील अनेक अकाऊंटधारकांवर आणि फेक अकाऊंटस् विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच त्यांच्या व पोलिसांविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,” अस करंदीकर यांनी सांगितलं.
2 FIRs registered under IT Act against many social media account holders & fake accounts for defaming Mumbai Police Commissioner on different platforms like Twitter, Instagram & FB & using abusive language against him & the force: Rashmi Karandikar, DCP-Cyber Cell, Mumbai Police pic.twitter.com/78Gc6aPyn7
— ANI (@ANI) October 6, 2020
आणखी वाचा- सुशांत सिंह आत्महत्या : मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी उघडले गेले ८० हजार फेक अकाऊंटस्
“बदनामीच्या हेतूनं मोहीम”
“कोविडच्या संकटात ८४ पोलिसांचा मृत्यू झाला. ६ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना करोनाची बाधा झाली, असं असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी, खच्चीकरण करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.