मुंबई : वसई-विरार मॅरेथॉननिमित्ताने ८ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

हेही वाचा – कोकण रेल्वेवर दोन दिवसीय ब्लॉक, मडगावसह दोन रेल्वेगाड्यांवर परिणाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी पहाटे चर्चगेट – विरारदरम्यान दोन अतिरिक्त विशेष धीम्या लोकल चालविण्यात येणार आहेत. चर्चगेटहून ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री २.३० वाजता धीमी लोकल चालविण्यात येईल. ही लोकल विरारला पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. यानंतर रात्री ३ वाजता दुसरी विशेष लोकल चालविण्यात येईल. ही लोकल पहाटे ४.३५ वाजता विरारला पोहोचेल. या दोन लोकलमुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रवास करणे सोयीचे होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.