मुंबई : या पावसाळ्यात मुंबईतील खड्ड्यांबाबत आलेल्या एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी पश्चिम उपनगरातून आल्या आहेत. यावर्षी पालिकेच्या रस्ते विभागाने एकूण ३४,३९२ खड्डे बुजवले असून त्यातील सर्वाधिक खड्डे हे अंधेरी ते मालाड परिसरातील आहेत. खड्ड्यावरून न्यायालयाने पालिकेला फटकरल्यानंतर पालिकेने खड्ड्याबाबतचा अहवाल तयार केला असून त्यातून ही माहिती पुढे आली आहे. एकूण खड्डयांपैकी सर्वाधिक खड्डे हे अंधेरी जोगेश्वरीच्या पूर्व भागातील आहेत. या भागातून २९६३ तक्रारी आल्या. मालाडमधून २७०९ आणि अंधेरी जोगेश्वरीच्या पश्चिम भागातून २४३२ तक्रारी आल्या. एकूण तक्रारींपैकी पश्चिम उपनगरातून खड्ड्यांच्या १६,१७० तक्रारी आल्या. त्या तुलनेत पूर्व उपनगरातून  ७८८५ तक्रारी रहिवाशांनी केल्या तर शहर भागातून १०,३३७ तक्रारी आल्या.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : सोलापूरात अजित पवारांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन; इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

हेही वाचा >>> सदनिका हस्तांतरणासाठी शासनमान्यतेची गरज नाही; १९८३ पूर्वी दिलेल्या जमिनींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच अहवालात पालिकेने मुंबईतील सर्वाधिक दुरवस्था झालेल्या वीस रस्त्यांची नावे दिली आहेत. यात शहर भागातील मुंबादेवी मार्ग, वि. एन. मार्ग, टी बी कदम मार्ग, टी जे रस्ता, बलराम बापू खेडेकर मार्ग यांचा समावेश आहे. तर पश्चिम उपनगरातील टागोर रस्ता, खेरवाडी रस्ता, आरे मरोळ मरोशी रस्ता, पु ल देशपांडे मार्ग, एन एस रोड नंबर ४ , आरे रस्ता, समता नगर रस्ता, भूमिपार्क मरिना एनक्लेव्ह रस्ता, आप्पासाहेब सिधये मार्ग आणि रामकुमार ठाकूर मार्ग यांचा समावेश आहे. पूर्व उपनगरात एम एन रस्ता, डी पी रोड नंबर ९, गोवंडी शिवाजी नगर रोड नंबर १५, सोनापूर लेन, भांडुप व्हिलेज मार्ग, दर्गा रोड या रस्त्यांचा समावेश आहे.