मुंबई : मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागतो. दरम्यान, रविवारपासून मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या आठवड्यात कमाल तापमानाचा परा ३५ अंशाच्या आसपास आणि किमान तापमान २० अंशाहून अधिक होता. मात्र, मागील एक – दोन दिवसांपासून तापमानात घट व्हायला सुरुवात झाली आहे. पहाटेच्या गारव्यामुळे नागरिकांना किंचित दिलासा मिळत आहे. मात्र, दिवसभर पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रविवारपासून किमान तापमानात २ – ३ अंशानी घट होईल, तर कमाल तापमान २८ – ३० अंशादरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – आयआरसीटीसी संकेतस्थळ काही काळ बंद

हेही वाचा – सागरी किनारा मार्गालगत तयार करणार हरित क्षेत्र, पालिकेचा पैसा खर्च न करता हिरवळ तयार करण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाने शनिवारी ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली होती. यानुसार मुंबईत संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण होते. परिणामी, मुंबईतील शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल तापमानात घट झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी २८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३०.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे शनिवारी अनेक भागातील कमाल तापमानात घट झाली. पुढील काही दिवस ही घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.