प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसची सेवा तात्पुरती रद्द करण्यात येत असल्याची माहिती इंडियन रेल्वे कॅटिरग अ‍ॅण्ड टूरिझम कॉपरेरेशने दिली. ही सेवा २४ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाळेबंदीत लांब पल्ल्याच्या गाडय़ाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला फक्त श्रमिकांसाठी मेल-एक्स्प्रेस चालवण्यात आल्या. त्यानंतर विशेष गाडय़ांची सेवाही सुरू केली. या सेवेबरोबरच १७ आक्टोबरपासून मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसही चालवण्यात आली. प्रवासादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना सॅनिटायझर किट देण्यात आले. तर एक्स्प्रेसमधील कर्मचाऱ्यांनाही मुखपट्टी, हातमोजांचा वापर बंधनकारक करण्यात आला. सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेऊनही तेजस एक्स्प्रेसची दररोज २५ ते ४० टक्केच तिकिटे आरक्षित होत होती. त्यामुळे आयआरसीटीसीला मोठा तोटाही सहन करावा लागत होता. याच मार्गावर शताब्दी, राजधानी व डबल डेकरही धावत असल्याने तेजसलाही त्याचा फटका बसला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai to ahmedabad tejas express canceled abn
First published on: 19-11-2020 at 00:17 IST