मुंबानगरीची ओळख असलेल्या बेस्टच्या डबलडेकर बसेस २०२३ पर्यंत पूर्णपणे बंद होणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या बसेसवर होणारा खर्च परवडत नसल्याने आणि आणि शहरातील रस्त्यावरील जागा कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य बसपेक्षा या बसेसच्या देखभालीचा खर्च जास्त असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले. १९३७ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या बस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या होत्या. पर्यटक आणि मुंबईतील प्रवासी यांच्याकडून या बसने प्रवास करण्याला कायम प्राधान्य दिले गेले. मात्र आता त्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीला या बसची संख्या अतिशय कमी होती. १९४७ ते ४८ च्या दरम्यान ती १४१ पर्यंत गेली आणि त्यानंतर १९९३ पर्यंत ही संख्या ८८२ इतकी झाली. सध्या शहरातील ७ मार्गांवर या १२० बसेस कार्यरत आहेत. त्यातील ७२ बसेस पहिल्या टप्प्यात २०२० च्या दरम्यान बंद करण्यात येणार असून पुढच्या टप्प्यात २०२३ मध्ये उर्वरित ४८ बसेस बंद करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. या बसच्या वरच्या डेकमध्ये पुढच्या बाजूला बसून शहराचा नजारा पाहण्याची संधी काही औरच असल्याचे मत या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली. वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार याबाबत म्हणतात, योग्य ते नियोजन केल्यास या बसेस सेवेत राहू शकतात. शहरात वाढत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता या बसने एकावेळी जास्त प्रवासी प्रवास करु शकतात. सध्या बसच्या ताफ्यामध्ये सध्या ३३३७ बसेस असून त्यातील १२० डबलडेकर आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais iconic double decker buses to be phased out by
First published on: 10-10-2018 at 19:54 IST