मुंबईः चोरीचा आळ घेऊन मेहूण्याला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरूणाचा चौघांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. शिवडी येथील दारूखाना परिसरात ही घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

मुख्तार मोहिनुद्दीन शेख(२३), मोहीन गुलामरसुल शेख(६२), मैन्नुद्दीन मोलेड खान(२५) व मेहमुद मोहिउद्दीन शेख(२८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. शेट्ठीबा विठ्ठल पवार(२४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो दारुखाना परिसरातील सुजाता हॉटेल समोरील झोपडपट्टीत राहात होता. पवार यांची आई फुलाबाई (५०) यांच्या तक्रारीवरून शिवडी पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> धारावीमध्ये बहुमजली झोपड्यांना भीषण आग, पहाटे ४ वाजल्यापासून आग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत शेट्ठीबा पवार याच्या मेहूण्यावर चोरीचा आळ घेऊन आरोपींनी मारहाण केली होती. ही माहिती पवारला समजल्यानंतर मंगळवारी तो जाब विचारण्यासाठी आरोपींकडे गेला. त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी पोटात व डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पवार खाली कोसळला. त्याला तात्काळ जे.जे. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पवार याची आई फुलाबाई यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.