राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील (४१) यांचे सोमवारी पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘जोगवा’ चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, त्यापाठोपाठ ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ असे लागोपाठ वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणाऱ्या राजीव पाटील यांनी नुकतेच ‘वंशवेल’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले होते. याच चित्रपटाच्या प्रसिध्दीत गुंतलेल्या राजीव पाटील यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. मूळचे नाशिकचे असणाऱ्या राजीव पाटील यांच्यावर आज, मंगळवारी नाशिक येथेच अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी इरा, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.
राजीव पाटील यांचे कुटुंब नाशिक येथे स्थायिक असून ते एकटेच बोरिवली येथे राहत होते. सोमवारी सकाळी त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांचे बंधू प्रशांत पाटील यांना कळवण्यात आले. अखेर, प्रशांत यांनी घर उघडल्यानंतर राजीव पाटील यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
राजीव यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक मराठी कलावंतांनी भगवती रुग्णालयाकडे धाव घेतली. आदेश बांदेकर, चिन्मय मांडलेकर, अवधूत गुप्ते, अजय गोगावले, श्रेयस तळपदे, मुग्धा गोडसे, पंढरीनाथ कांबळे अशा अनेक कलाकारांनी आपल्या सहकाऱ्याचे अंतिम दर्शन घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे निधन
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी मुंबईत निधन झाले.

First published on: 01-10-2013 at 02:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National award winner director rajiv patil passed away