मुंबई: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि राजकीय क्षेत्रात संस्कृतपणा जपलेले व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचे नाव देशभरात झळाळत आहे.

हेही वाचा >>> भास्कर जाधव अजित पवार गटात जाणार? धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “एक चांगली व्यक्ती आमच्याकडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेतृत्व, वक्तृत्व , उत्तम प्रशासक म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मानसन्मान वाढवला आहे. याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा ‘मंगलकलश‘ यशवंतरावाच्याच प्रयत्नांनी आणला गेला. देशाचे गृहमंत्री, उपपंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द दैदिप्यमान आहेच. अशा व्यक्तिमत्त्वाचा यथोचित सन्मान हा केवळ ‘भारतरत्न’ देऊनच होऊ शकतो. त्यासाठी राज्य सरकारने एकमताने शिफारस करून यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ सन्मान देऊन त्यांचा गौरव करावा, असे या निवदेनात चव्हाण यांनी म्हटले आहे.