राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. पहाटे पाच वाजताच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घऱी पोहोचले होते. यानंतर त्यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ‘ईडी’च्या रडारवर ; पहाटेच पथक घरी धडकलं!

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे अशी टीका केली आहे. ते म्हणाले की, “हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही, सूचना ने देता पहाटे सहा वाजता येऊन ईडी स्वतःच पोलीस आणत राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे”.

“अलीकडे नवाब मलिक यांनी काही प्रकरणं बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचं काम करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहे. नेमकं कोणते प्रकरण आहे याबद्दल माहिती नाही, गेल्या काही वर्षात असं प्रकरणही दिसत नाही. नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

संजय राऊतांची प्रतिक्रिया –

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत, जे सातत्याने बोलत आहेत. असत्य उघड करत आहे, मुखवटे उलगडून काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी,सीबीआय वैगरे लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीची लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठीक आहे, चौकशी होईल आम्ही वाट बघतोय. नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील. आताच माझं सगळ्यांची वरिष्ठ स्तरावर बोलणं झालं आहे.”

“महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपासयंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची, म्हणजे चौकशी पण कशी २०-२० वर्षानंतर ते करत आहेत. २०-२५ वर्षापूर्वीचं प्रकरण. पण किरीट सोमय्या यांनी काही प्रकरण ईडीकडे दिलेली आहेत. भाजपा नेत्यांची म्हणजे आज जे भाजपात मंत्री आहेत, पदावर आहेत, केंद्रीय मंत्री आहेत त्यांची अनेक प्रकरणं. भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा हा शब्द चांगला आहे, कारण त्यांना मी काही बोललो तरी वाटतं मी शिवी दिली. जे महात्मा आहेत, त्यांनी ईडी कडे अनेकांची प्रकरणं दिलेली आहेत, त्यांना का समन्स गेलं नाही? त्यांच्या घरी ईडी का नाही पोहचली,” असंही ते म्हणाले.