सुप्रिया सुळे यांचा सवाल
मुंबई : राष्ट्रीय पातळीवर भाजपचा मोठा बागुलबुवा उभा करण्यात आला आहे. सारा देश भाजपमय झाल्याचे चित्र उभे करण्यात येते. आसाम आणि मेघालयाचे भाजप किं वा मित्र पक्षांचे मुख्यमंत्री हे मूळचे काँग्रेसचे. अनेक राज्यांमध्ये जुने काँग्रेस किं वा अन्य पक्षातील नेते भाजपमध्ये महत्त्वाच्या पदांवर विराजमान झाले. महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी शेखी मिरविणाऱ्या भाजपमध्ये फरक (डिफरन्स) कुठेच दिसत नाही. हे सारे चित्र बघितल्यावर मूळ भाजप कुठला, असा प्रश्न पडतो, असा चिमटा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात सहभागी होताना भाजपला काढला.
उत्तर प्रदेश आणि बिहारचा अपवाद वगळता उत्तरेतील अन्य राज्यांमध्ये भाजप आहे कु ठे आहे. मध्य प्रदेशात भाजपचा पराभव झाला होता. परंतु तोडफोड करून सत्ता मिळविली. राजस्थान, झारखंड, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये भाजप विरोधात आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप अस्तित्वहीन आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकताच भाजपचा दारुण पराभव झाला. तमिळनाडू, के रळ आदी राज्यांमध्ये भाजपची कामगिरी सुमारच झाली. आसामध्ये सत्ता कायम राखली तरी मुख्यमंत्रीपद जुन्या काँग्रेस नेत्याकडे सोपविले. लोकांचा भाजपवर पूर्ण विश्वास नाही हेच यातून स्पष्ट होते, असे मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला. किमान समान कार्यक्र मांवर आधारित या सरकारचा कारभार सुरू आहे. सरकार स्थापन झाल्यापासून आपापसातील मतभेदांमुळे हे सरकार गडगडणार, असे विरोधक दावे करीत आहेत. गेली दीड वर्षे सरकार चांगल्या प्रकारे सुरू आहे. आता तर राष्ट्रीय पातळीवर महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची दखल घेतली जाऊ लागली.
जातीच्या राजकारणाला बळ मिळू लागल्याबद्दल सुप्रियाताईंनी खंत व्यक्त के ली. यातून संकु चित विचार पुढे येऊ लागला. शिक्षण आणि साक्षरतेपुढेही जातव्यवस्था अधिक प्रभावी ठरू लागली. राजकारणात व्यापक विचारांऐवजी जातीच्या राजकारणाला प्राधान्य मिळत गेले. हे देशासाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त के ले.
२०२४ मध्येही दिल्लीतच जाणार
दिल्ली की मुंबईत राजकारण करायला आवडेल, या प्रश्नावर पक्षाने संधी दिल्यास आगामी लोकसभा निवडणूक बारामती मतदारसंघातून लढणार आहे. दिल्लीच्या राजकारणाची सुरुवात ही राज्यातूनच होते. यामुळे राज्यातून निवडून येऊन दिल्लीत जाईन. माझी भूमिका स्पष्ट आहे आणि दिल्लीतच काम करायला आवडेल.
१४ वर्षे झाली तरी अजितदादांबरोबरील मतभेदाची चर्चा
अजित पवार आणि माझ्यामध्ये काही मतभेद आहेत ही एक खूपच हास्यास्पद चर्चा आहे आणि आता १४ वर्षे जुनी व गुळगुळीत झाली आहे. मुळात या कु जबुजीला कसलाच आधार नाही. कोणत्या विषयात असे झाले असे काही उदाहरण नाही. अजितदादा हे माझे मोठे भाऊ आहेत. राजकारणातील अनुभव आणि प्रशासनातील अनुभवही त्यांचा मोठा आहे. आम्ही उलट परस्पर पूरक आहोत. आम्हाला दोघांना कु ठले पद पाहिजे इतका छोटा विचार आम्ही करत नाही. प्रश्न के वळ आमचा नाही तर गेली कित्येक दशके चांगल्या आणि वाईट दिवसांत शरद पवारसाहेबांची सोबत करणारे हजारो लोक बघितले आहेत. त्यांचा विचार के ल्याशिवाय आमची संघटना पूर्ण होत नाही. कु ठल्याही संघटनेत या गोष्टींबाबत संभ्रम नसावा. तो त्या संघटनेसाठी घातक ठरतो. त्यामुळे हे स्पष्ट के ले पाहिजे की आमच्यासाठी के वळ पवार हे कु टुंब नाही तर राष्ट्रवादी हे एक कु टुंब आहे. त्या सर्वाना सोबत घेऊन जायची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे नव्या पिढीत रोहित राजकारणात असला तरी त्याचे कु टुंब राजकारणात समोर दिसत नाही. पण ते काम करत असतात. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही समाजकारणात व्यग्र असतात. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक गुणवंत नेते आहेत.
बाळासाहेब आणि पवार चार दशकांपासून एकत्र
शिवसेनेबरोबर एकत्र येऊन सत्ता स्थापन होईल, असा विचार कधी मनात आला होता का, या प्रश्नावर बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील शरद पवार यांनी चार दशकांपूर्वी एकत्रित साप्ताहिक काढले होते. तेव्हा उभयता एकत्र होते. ठाकरे आणि पवार कु टुंबीयांचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी आमची मैत्री मात्र कायम होती. राष्ट्रवादी व काँग्रेस एकाच घरातील दोन पक्ष. किमान समान कार्यक्र मावर आधारित शिवसेना बरोबर आला.
घरी भोजन आणि पवारांवरच टीका
विरोधकांनी सरकारच्या कारभारावर टीका करायची असते. लोकशाहीत विरोधकांचे तेच काम असते. फक्त ही टीका वैयक्तिक नसावी. दुर्दैवाने अलीकडे वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्याची प्रथा रुढ होऊ लागली. त्यातून कटुता वाढते. याबाबत आमच्या घरातील जुने किस्से आठवतात. अनेक समाजवादी किं वा विरोधी विचारांचे नेते आमच्या घरी भोजनासाठी येत असत. भोजनाच्या वेळी छान गप्पा होत असत. घरातून बाहेर पडल्यावर हीच मंडळी पवारांवर टीका करायचे. पण शरद पवारांनी ही टीका कधी वैयक्तिक घेतली नाही वा टीका करणाऱ्या नेत्यांबरोबरील संबंधात अंतर येऊ दिले नाही.
बारामतीला कधीही विसरू नकोस..
मी स्पर्धात्मक स्वभावाची आहे. स्वत:शी स्पर्धा करत असते. पण माझ्या आई-वडिलांनी कधीच माझ्यावर हेच कर ते करू नको, असे के ले नाही. कोणत्याही निर्णयातून काय होईल याचे विश्लेषण करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले.माझा पांडुरंगावर विश्वास आहे. पण माझ्या निवडणुकीतील किं वा इतर यशासाठी मी कधी त्याला साकडे घालत नाही. त्यासाठीचे कष्ट मीच करायला हवेत हा माझ्यावरील संस्कार आहे. मी १४ वर्षांपूर्वी संसदेत पहिले पाऊल टाकले. त्यावेळी वडिलांनी एक मोलाचा सल्ला दिला की पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत, बारामतीला कधी विसरू नकोस. संसदेची पायरी चढायला मिळणे ही एक खूप मोठी संधी आहे. बारामतीच्या जनतेमुळे ही संधी मिळते हे लक्षात ठेव. ज्या दिवशी बारामतीला विसरशील त्या दिवशी संसदेची ही पायरी चढता येणार नाही हे लक्षात ठेव.
महिलांच्या विषयांचा नव्याने विचार करावा लागेल
अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे यांना पाहतच मी मोठी झाले. वडिलांनी मुख्यमंत्री असताना महिला धोरण आणले. त्यात महिला सुरक्षा हा विषय होता. आताच्या काळात त्याचे संदर्भ बदलले आहेत. आता मुलींच्या शिक्षणाचा स्तर वाढला आहे. व्यावसायिक क्षेत्रातील सहभाग वाढला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महिला दिवसरात्र काम करत आहेत. आताच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना अश्लील संदेश पाठवले जातात. ते आव्हान नवीन आहे. तसेच महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी बचत गट चळवळ आली. आता काळ बदलला. ऑनलाइन व्यापाराच्या काळात मोठी दुकाने टिकणे कठीण होत आहे तिकडे बचतगट कसे टिकतील. त्यामुळे महिलांबाबतच्या योजना-धोरणे कालानुरूप बदलावे लागतील. त्यासाठीच्या संकल्पना बदलाव्या लागतील.
मोठी स्वप्ने पाहायला हवीत
पुढच्या १० वर्षांचा विचार करता मी दिल्लीत संसदेत काम करणार, तेथे महाराष्ट्रासाठी काम करणार. पक्षात नवीन पिढी यावी पक्षाची विचारसरणी त्यांना स्पष्ट असावी. देशाच्या घटनेप्रती बांधिलकी स्पष्ट हवी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम करत असतो. विज्ञाननिष्ठ आधुनिक महाराष्ट्र-भारत आपल्याला घडवायचा आहे. के वळ साक्षर नाही तर सुशिक्षित व सुसंस्कृत नवी पिढी घडवायचे ध्येय हवे. आर्थिक धोरण, पर्यावरण या सर्व बाबतीत जगाच्या तोडीस तोड काम होईल असा विचार आपण के ला पाहिजे. न्यूयॉर्क शहरात गुन्हेगारी, प्रदूषणसह अनेक समस्या होत्या. पण त्यांनी त्या शहराचा कायापालट केला. दक्षिण आशियातील मलेशिया व इतर देशांनी पर्यावरण जपत पायाभूत सुविधा उभ्या केल्या व त्यातून त्यांचा विकास होत आहे. मग आपण महाराष्ट्रात का नाही तसे मोठे काम करत, एखादा प्रकल्प आला तर ४५ दिवसांत तो करायचा की नाही याचा निर्णय घेऊन सोक्षमोक्ष लावायला हवा. के वळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील तामिळनाडू, झारखंडसारख्या राज्यांतही चांगले प्रशासकीय काम होत असल्याची उदाहरणे आहेत. सर्व जण मिळून जगातील एक चांगली व्यवस्था उभी करूयात मोठी स्वप्ने पाहूया, नवाभारत घडवू या.
-: वेळापत्रक :-
१ जून: मनसेचे प्रमुख राज ठाकरे
२ जून: वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर
३ जून: काँग्रेसतर्फे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
४ जून: माजी मुख्यमंत्री, भाजपचे देवेंद्र फडणवीस</p>
५ जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे</p>
प्रायोजक
* प्रस्तुती : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
* सहप्रायोजक : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.
ऑनलाइन सहभागासाठी..
या दूर-संवाद मालेत सहभागी होण्यासाठी http://tiny.cc/LS_Drushti_ani_Kon येथे नोंदणी आवश्यक.
क्यूआर कोडद्वारेही सहभागी होता येईल.